रत्नागिरी मिरकरवाडा येथील मासेमारी होडी बंदरात परतताना भगवती बंदर येथे समुद्रात बुडाली. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हि दुर्घटना घडली. या बोटीवर आठ खलाशी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी सहा खलाशांना स्थानिक मासेमारी बोटीने वाचवले मात्र दोन खलाशी अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.