राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला ही घटना निंबोळी येथे त्यांच्या राहत्या घरी घडली असून रात्रीच्या सुमारास त्यांच्या चार चाकी वाहनावर दगड फेकून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले अनेक वर्षापासून सामाजिक कार्यातून गोरगरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत असून त्यांच्या कार्यामुळे त्यांनी लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे