मुंबई दौऱ्यावर असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास राज्यसभा सदस्य, पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या डब्लू-54, हाउसिंग सोसायटी, बाल गोविंद रोड येथे घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा आरती केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, भाजपा मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष अमीत साटम आम्ही सगळे सहभागी झालो.