पिंपरी-चिंचवड शहरात मास्क मॅनची दहशत निर्माण झाली आहे. भर रस्त्यात आणि भर दिवसा हातात धारदार चाकू घेऊन हा मास्क मॅन फिरताना नागरिकांच्या नजरेस पडला.निगडीतील बजाज ऑटोमोबाईलजवळील HP पेट्रोल पंपाजवळ काही वेळापूर्वी हा संशयित मास्क मॅन हातात चाकू घेऊन रस्ता क्रॉस करताना दिसला. चेहऱ्यावर मास्क असल्याने त्याची ओळख पटलेली नाही.