धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारातील शेडमध्ये विनापरवाना साठवलेले सुमारे ९८ हजार रुपयांचे खत व जैव उत्तेजक कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले. स्वराज्य अॅग्रो कृषी माहिती केंद्राचा संचालक हेमंत पाटील (रा. मोहाडी) याने आर्थिक फायद्यासाठी नाशिक येथून हा साठा आणला होता. जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईनंतर, खत निरीक्षकाच्या फिर्यादीवरून पाटीलविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल झाला.