परदेशी नागरिकांबाबत संसदेमध्ये एक बिल पारित करण्यात आलं होतं आजपासून ते बिल लागू करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तशा सूचना दिल्या आहेत. याबाबत विचारणा केली असता भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितले की, ज्या सूचना केंद्राने दिल्या आहेत त्याच्या गाईडलाईन्स प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर त्या सूचनाप्रमाणे अंमलबजावणी सर्व ठिकाणी करण्यात येईल असे मत व्यक्त केले. ते 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.