सत्यपाल महाराज यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करा कोहमारा : वयाच्या तीस वर्षांपासून सातत्याने कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करीत असलेले सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज (चिंचोलकर) यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील समाजसेवक रोशन बडोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ व समाजसेवा बरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या बारा व्यक्तींची निवड व