हिंगणघाट येथील माहेश्वरी भवन येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.या निमित्ताने यशोदा मैय्या व कृष्ण कन्हैया वेशभूषा प्रतियोगिता भव्य, दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार समिर कुणावार, श्रीमती लतादेवी मोहता, प्रमुख वक्ता म्हणून विहिप प्रांत विदर्भ मंत्री प्रशांत तितरे, अटल पांडे, संतोष गायकवाड,वर्धा जिल्हा उपाध्यक्षा वंदना चाफले वैशाली खेतल, सुरेंद्र आगरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.