बैलपोळा सणाच्या निमित्ताने लहान बालकांना बैलांचे महत्त्व व बैलांविषयी आदर निर्माण व्हावा या उद्देशाने बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे. याच परंपरेनुसार दिनांक 23 ऑगस्ट रोज शनिवारला सायंकाळी साडेचार ते सहा वाजता दरम्यान तिरोडा शहरातील गुरुदेव चौक येथे तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात आला.