उस्थळे शिवारात गत अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असल्या बाबत ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास भक्षांच्या शोधात असलेला बिबट्या अलगत पिंजऱ्यात अडकला. वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन रेस्क्यू केले.