गेल्या एक वर्षापासून वाशिम जिल्ह्यातील जवळपास 33 ग्रामपंचायतीचे आयडी बंद असल्यामुळे जन्म मृत्यूचे दाखले मिळत नसून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून सदर आयडी त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी येवता येथील गजानन देशमुख यांनी दिनांक 8 सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन दिले आहे.