जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोरील कैलास हॉटेलशेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास डल्ला मारला. चोरट्यांनी थेट मशीनच उखडून 16 लाख 7 हजार 100 रुपयांसह एटीएम घेऊन फरार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे वेरूळ परिसरात एकच खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या या एटीएममधून दररोज लाखो रुपयांची रोकड काढली जात होती.