काल मध्यरात्री एकबुर्जी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढून दि. 02 सप्टेंबर रोजी चंद्रभागा नदीला मोठा पुर आल्यामुळे बोरखेडी ते वाशिम रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करतांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.