बाभूळगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची सुद्धा पडझड झाली आहे.त्यामुळे पंचनामे करून त्यांना तातडीची मदत देण्यात यावी तसेच सरसकट अतिवृष्टीची मदत जाहीर करावी या आशयाचे निवेदन आज दिनांक 21 ऑगस्टला शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख गजानन पांडे,प्रसिद्धी प्रमुख शैलेश भगत, अनिल गावंडे, किरण घोडे संतोष ठाकरे,शैलेश गावंडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.