आज दि २९ ऑगस्ट रोजी सांयकाळी सात वाजता माहिती मिळाली की भिलदरी, शफियाबाद व परिसरातील गावांमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक गावकरी व शालेय विद्यार्थी जखमी झाले असून काही मुलांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.कुत्र्याच्या वाढत्या दहशतीमुळे गावकरी आणि शाळकरी मुले भयभीत झाले असून घराबाहेर जाणे अवघड झाले आहे. अनेक दुचाकीस्वारांवर देखील हा कुत्रा हल्ला करीत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली