बुधवार दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून मानसिक विभागप्रमुख डॉ. नितीन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसिक विभाग प्रमुख डॉ. देवाजी, डॉ. कुलकर्णी, मेट्रोन आणि नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या उपस्थित होत्या.