शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक हे समारोसमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्या प्रकरणी ओबीसी समाजाच्यावतीने दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून नीरा, लोणंद परिसरात बंद पाळण्यात आल्याची माहिती ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता दिली.