राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा-श्रीरामपुर रोडवर बस अन् मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.रामेश्वर कांतीलाल जगताप (वय४८) राहणार कोपरे ता. राहुरी असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.काल बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान नर्सरी जवळ रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून मदतकार्य केले.