मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्गजवळील साई प्लाझा हॉटेलसमोर आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला.