सावली तालुक्यातील पाथरी येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला अखेर आज जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे सदर वाघिणीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले आहे याच वाघिणीने मागील दोन दिवसांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला उचलून ठार केल्याची घटना घडली होती