पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील नदी, ओढे, नाले यांना पाण्याचा ओघ वाढला असून अनेक गावांमध्ये नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे होऊन मदत मिळावी अशी मागणी आज २९ सप्टेंबर रोजी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.