मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान सोडण्याचे आदेश दिले. मुंबई पोलिसांनी पाटील यांना नोटीस बजावल्याबद्दल आज मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. आम्हाला न्यायालयाबद्दल खूप आदर आहे. न्यायालयाने काय म्हटले आहे, काय म्हटले नाही ते सर्वांसमोर आहे. आज मनोज जरांगे यांना ५ दिवस झाले आहेत हे दुर्दैवी आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही.