अवैधरित्या खैराची तस्करी होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे वज्रेश्वरी- शिरसाड मार्गावर पारोळ परिसरात वन विभागाने सापळा रचून संशयित वाहनांची झाडझडती घेतली असता त्यामध्ये अवैधरित्या खैराचे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वनविभागाने कारवाई करत खैराचे 554 ओंडके, 4 वाहने असा 32 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.