चिखली मतदारसंघातील मौजे अटकळ येथे परवा रात्री श्री. दत्तात्रय लक्ष्मण खोंडे यांच्या शेतातील गोठा पेटल्याने दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला आणि शेतीच्या अवजारांसह गोठा खाक झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी असली तरी या संकटात आम्ही शेतकरी बंधू श्री. खोंडे यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी तहसीलदार श्री. कुमरे यांच्याशी चर्चा करून पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अशा प्रकारची माहिती आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी दिली.