सातारा शहरात डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी मागणी केली होती, मात्र शासनाच्या नियमाच्या आधीन राहून, डॉल्बी वाजवण्यास प्रशासनाकडून मान्यता दिल्यानंतर, शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता शहरातील सर्व मिरवणुकीच्या डॉल्बी बंद झाल्या, त्यामुळे डॉल्बी धारकांनी शासनाचे नियमांचे पालन केल्याचे पाहायला मिळाले, सातारा शहरात शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात गणपतीच्या विसर्जन मिरवणूक निघाल्या होत्या.