चिखली MIDC येथील खाजगी गोडाऊनमध्ये कामगार कल्याण विभागामार्फत कामगारांना पेट्या वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील शेकडो कामगारांना आजची तारीख देऊन बोलावण्यात आले, परंतु प्रत्यक्षात तिथं कोणतीही तयारी नव्हती. साधा शिपाईसुद्धा उपस्थित नव्हता आणि संबंधित ठेकेदार व कर्मचारी फोनही उचलत नव्हते. त्यामुळे कामगारांना प्रचंड गैरसोय झाली.हि बाब बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष चिखली विधानसभेचे मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हा प्रश्न सोडवला.