महसूल विभागाची अवैध गौण खनिज वाहतूकीवर धडक कारवाई *५ हायवांवर जप्त, महसूल विभागाने अमरावती तालूक्यातील अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूकीवर सोमवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पाच हायवांवर कारवाई करण्यात आली. पाचही हायवा जप्त करून नवीन तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. अवैध गौण खनिज वाहतूकीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.