दिंडोरी: पिंपळगाव केतकी शिवारामध्ये कैलास देशमुख यांच्या शेतात मादी बिबट जेरबंद
पिंपळगाव केतकी शिवारामध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे कैलास देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी 5 ते 6 वर्षाची मादी जेरबंद करण्यात यश आलेले आहे. सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्राधिकारी सुशांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक योगेश दळवी,वनसेवक शांताराम शिरसाट, जयराम शिरसाठ आणि वनमजूर यांनी या कामी मेहनत घेतली.