सेलू: केळझर जवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, कार चालकाला तरुणांनी पाठलाग करून पकडले
Seloo, Wardha | Nov 20, 2025 वर्धा–नागपूर महामार्गावर केळझर शिवारात आज ता. २० नोव्हेंबर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मृतकाचे नाव राजू देवतारे (वय ५०, रा. पवनार) असे असून, धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, उपस्थित तरुणांनी धाडस दाखवत त्याचा पाठलाग करून दहेगाव रोडवर गाडी ताब्यात घेतली.