शिरपूर: जुने भामपूरमध्ये 14 वर्षीय मुलाला लोखंडी बैलगाडीत टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न;दोघांवर गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Nov 22, 2025 तालुक्यातील जुने भामपूर येथे ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या संशयावरून 14 वर्षीय अल्पवयीन मुलास 19 नोव्हेंबर रोज निर्घृण मारहाण करून हातपाय बांधून लोखंडी बैलगाडीत टाकत खाली आग लावून चटके देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी पीडिताचे वडिल संतोष गवळी याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून चिंतामण उर्फ चिंटूभाऊ साहेबराव कोळी व सचिन साहेबराव कोळी या दोघांवर गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.