काटोल: कोंढाळी परिसरात राबविण्यात आले कोबिंग ऑपरेशन
Katol, Nagpur | Nov 3, 2025 पोलीस स्टेशन कोंढाळी हद्दीत आज कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यादरम्यान कुख्यात गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच नाकाबंदी करून संशयीत वाहनांची देखील झेडपी घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन राबविण्यात आले