पवनी: पवनी नगर परिषदेच्या रणांगणात उलथापालथ; डॉ. विजया ठाकरे नंदूरकर यांचा भाजपला रामराम
नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्हा भाजपच्या माजी सचिव डॉ. विजया नंदूरकर यांनी अचानकपणे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी दिला. तुमसरात प्रदीप पडोळे यांच्या राजीनाम्याला एक दिवस लोटत नाही तोच, आता विजया नंदूरकर यांचाही राजीनामा आल्याने जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. डॉ. विजया नंदूरकर यांनी २०१६ मध्ये बसपाकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.