कन्नड: हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशाच्या चर्चेत खैरेंचा ठाम विरोध,ठाकरे शिवसेनेत प्रवेशावरून तापलं राजकारण
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.अलीकडेच जाधव यांनी विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी चालना मिळाली.मात्र पक्ष प्रवेशाच्या या चर्चांदरम्यान आज दि 3 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांना पक्षात घेण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.