मावळ: बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून आरोपीला अटक
Mawal, Pune | Nov 7, 2025 बांगलादेशातून एजंटांच्या माध्यमातून आणलेल्या १३ वर्षीय मुलीला डांबून ठेवले. तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी जहीरूल उर्फ सूरज जमाल इस्माल (आसाम) याला अटक केली.