आर्वी: निवडणूक चिन्ह मिळताच राजकीय वातावरणाचा रणसंग्राम तापला..खासदारासह दोन्ही आमदाराची प्रतिष्ठा पणाला...
Arvi, Wardha | Nov 26, 2025 आर्वी नगरपालिकेच्या निवडणुका दोन तारखेला होणार आहे याच पार्श्वभूमीवर नगरपालिका सभागृहात निवडणूक चिन्हाचे आजउमेदवारांना वितरण करण्यात आले. वितरण होताच आजपासून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली,महत्त्वाच म्हणजे खासदार अमर काळे ,विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखडे, विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे ,यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आर्वीकर मतदारांना एक नगराध्यक्ष आणि 25 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.. यासाठी सहा नगराध्यक्ष पदाचे दावेदार आणि 86 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे..