बालेवाडीतील ममता चौक येथे मेडीकेअर केमिस्ट अँड ड्रगिस्ट या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६८,३०० रुपयांची रोकड लंपास केली. २ डिसेंबरच्या रात्री 12 ते ३ डिसेंबरच्या सकाळी ७.१३ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली. चोरट्याने कुलूप तोडत शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व ड्रॉवरमधील रोकड चोरून नेली. घटनेची नोंद बाणेर पोलीस ठाण्यात २८९/२०२५, भा.दं.वि. ३०५, ३३१(४) प्रमाणे करण्यात आली असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.