भंडारा: धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला! मर्हेगाव येथील घटना
मर्हेगाव येथील शेतात धान कापणी करत असताना महिला मजुरांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविल्याने दहाजण जखमी झाल्या. ही घटना सोमवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. रामाजी बेंद्वार यांच्या शेतात महिला मजुरांचा गट नित्याप्रमाणे धान कापत होता. शेतातील पळसाच्या झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यावर नकळत धक्का बसल्याने मधमाश्यांनी थव्या-थव्याने हल्ला केला.