भंडारा: भाजप जिल्हा कार्यालय येथे भाजप भंडारा ग्रामीणची 'सेवा पंधरवडा' कार्यशाळा संपन्न
भारतीय जनता पक्ष भंडारा ग्रामीण ठाणा मंडळातर्फे सेवा पंधरवडा कार्यशाळेचे आयोजन भाजप जिल्हा कार्यालयात दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणाऱ्या सेवा पंधरवड्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला भाजप भंडारा जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, ठाणा मंडळ ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय लिचडे, कल्याणी निखाडे, जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेते विनोद बांते यांनी मार्गदर्शन केले.