सातारा: साताऱ्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच विकासकामांनाही वेग, राजवाडा येथील तांदूळआळी येथे रस्ता डांबरीकरण सुरू
Satara, Satara | Nov 11, 2025 सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच शहरातील विकासकामांनाही वेग आला आहे. राजवाडा परिसरातील तांदूळआळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी वाहतुकीसाठी तात्पुरता बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करत आहे. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून हा रस्ता रहदारीसाठी खराब झाला होता त्यामुळे या रस्त्याची डामरीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.