उमरेड: उमरेड येथे महिलेला गांजा पुरविणाऱ्या आरोपीला बडा ताजबाग येथून अटक
Umred, Nagpur | Nov 28, 2025 अमली पदार्थ विरोधी कार्यवाही पथकाने उमरेड येथे एका महिलेला गांजा विक्री केल्याप्रकरणी अटक केली होती या महिलेकडून तब्बल दोन लाख 26 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यात ऑम्लेट पोलिसांनी सखोल तपास करीत साखळी पुरावे जोडून गांजा पुरविणारा आरोपी सोनू उर्फ इरफान खान याला बडा ताजबाग येथून अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.