वाशिम: पाणी, घरे, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगार व शहरी विकासाला गती देण्यासाठी भाजप नगरपालिकेमध्ये आवश्यक
- मुख्यमंत्री
Washim, Washim | Nov 28, 2025 केंद्रापासून ते पालिकेपर्यंत भाजपची सत्ता असल्यास विकासाला वेग येईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशीम येथील प्रचार सभेत केले ते दिनांक 28 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व 32 नगरसेवकांच्या प्रचारार्थ आलेल्या सभेत बोलत होते. या सभेमध्ये त्यांनी वाशिम नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाची उमेदवार अनिल केंदळे यांच्यासह 32 नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन केले.