परळी: निकृष्ट रस्ता केल्याप्रकरणी शरद पवार गटाच्या वतीने सिरसाळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, घटनास्थळी पोलीस दाखल
Parli, Beed | Nov 27, 2025 परळी तालुक्यातील सिरसाळा गावात अत्यंत निकृष्ट व आवस्थेत असलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. दैनंदिन ये-जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन केले. तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली