नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येत असतानाच महाड शहरात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल रात्री फ्लॉवर व्हॅली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ रस्त्याच्या कडेला गुलाल लागलेला नारळ, हिरव्या बांगड्या, काळ्या कापडाची टोपली, हळदी-कुंकू, काळी भाऊली यांसारखे साहित्य आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.