सातारा: संगम माहुली येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्रिपुरासुराचा दहन सोहळा
Satara, Satara | Nov 6, 2025 संगम माहुली येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प. पु. नंदगिरी महाराज सोळशी यांच्या हस्ते पारंपरिक विधीने त्रिपुरा स्वराचे दहन करण्यात आले आणि त्यानंतर महाआरती करून भाविकांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.या वेळी आकाशात चमकलेल्या आतिषबाजीने वातावरण रंगतदार झाले, तर घाट परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.