गोरेगाव: दोडके जांभळीच्या जंगलात हिस्त्र पशुच्या हल्ल्यात इसम ठार
वनविभाग सडक अर्जुनी व पोलीस स्टेशन गोरेगाव अंतर्गत येत असलेल्या दोडके जांभळी सहवन क्षेत्रातील कंपार्टमेंट क्र.661 मध्ये दि.29 नोव्हेंबरला शनिवारला दु.12 वाजेच्या सुमारास जांभळी येथील रहिवाशी कनसू उईके वय 73 वर्षे यांच्यावर हिस्त्र पंशुनी हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभाग सडक अर्जुनी व गोरेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते,हवालदार राष्ट्रपाल तुमडाम तसेच वन विभागाचे अधिऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला