शिरूर कासार: पेट्रोलिंगदरम्यान पौडूळ फाट्यावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की वाळूने भरलेला ट्रॅक्टर अनधिकृतपणे येत आहे.त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून महिंद्रा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ही कारवाई शिरुर तालुक्यातील पौडूळ फाट्यावर आज शुक्रवार दि 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता करण्यात आली. चौकशीत चालक भाऊसाहेब विश्वंभर काशीद हा वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रॅक्टर व वाळू असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आ