बल्लारपूर येथील युवकाने सास्ती मार्गालगतच्या पुलावरून वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. सागर नागेश अंगुरी (३२) सुभाष वॉर्ड, बल्लारपूर असे आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे.