माण: राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार : आमदार महादेवराव जानकर
Man, Satara | Oct 24, 2025 राष्ट्रीय समाज पक्ष महायुती बरोबर जाणार नाही आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. सांगोला येथे मेळावा होणार असून त्यानंतर आमची भूमिका अधिक स्पष्ट होईल अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली. माण तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार महादेव जानकर यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता पत्रकारांशी संवाद साधला आणि आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.