विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला असून नाशिक शहरात देखील ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानक, नाशिकरोड, जेलरोड परिसरात अन्नदान करण्यात आले.माजी नगरसेवक विशाल संगमनेर यांच्या जेलरोड येथील संपर्क कार्यालयासमोर ज्येष्ठ नागरिक अशोक काशिनाथ माळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.