कावडशी-डोमा मार्गावर सायंकाळी सुमारे 5:30 ते 6 वाजताच्या दरम्यान ट्रक उलटण्याची घटना घडली. अंधारात ड्रायव्हरचा अंदाज चुकल्यामुळे वाहन रस्त्याबाहेर गेले आणि पलटी झाले, अशी माहिती मिळते. अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरला स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत शंकरपूर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.